नगर येथे दुर्गादौडीत मशिदीसमोर भगवा ध्वज हातात धरून छायाचित्र काढल्यावरून धर्मांधांकडून २ हिंदूंना गंभीर मारहाण !

हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खात रहाणार ? ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही, हे जाणा !

nagar_nivedan
उपजिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

नगर : दसर्‍याच्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबरला येथेे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये आशा चित्रपटगृहाजवळील मशिदीसमोर हिंदूंनी भगवा ध्वज हातात घेतलेले छायाचित्र काढले. त्यामुळे धर्मांधांनी धर्मभावना दुखावल्याचा कांगावा करत श्री. आकाश निस्ताने आणि श्री. अजय बोडखे या हिंदूंना गंभीर मारहाण केली. या प्रकरणी धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट झाला असला, तरी पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवरही गुन्हा प्रविष्ट केला, तसेच हिंदु राष्ट्र सेनेचे सहजिल्हाप्रमुख श्री. सागर ठोंबरे यांना स्थानांतर (हद्दपार) करून त्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली. (धर्मांधांची तळी उचलत हिंदूंना धमकावणारे पोलीस हिंदूंना कधीतरी न्याय देतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. दुर्गामाता दौड मशिदीसमोर आल्यावर श्री. आकाश निस्ताने यांनी लहान मुलाचे हातात भगवा ध्वज घेतलेले छायाचित्र काढले आणि मित्रांना दाखवले.

२. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा करत धर्मांधांनी श्री. निस्ताने आणि श्री. अजय बोडखे यांना १३ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजता तलवार, गुप्ती आणि दांडके यांद्वारे गंभीर मारहाण केली.

३. श्री. निस्ताने आणि श्री. बोडखे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्या दोघांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. श्री. निस्ताने यांची प्रकृती गंभीर आहे.

४. १४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी श्री. बोडखे यांना पोलीस ठाण्यात नेल्याची वार्ता हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्त्यांना मिळताच ते पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी गेले. या वेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून त्यांना तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.

५. जातीय तेढ निर्माण केले, असे म्हणत पोलिसांनी श्री. निस्ताने यांच्यावरच गुन्हा नोंद केला.

पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्याकडून हिंदूंना शिवीगाळ, पोलिसांकडून घायाळ हिंदूंवरच गुन्हा प्रविष्ट !

(हिंदूंनो, अशा पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा आणि त्याची माहिती सनातन प्रभातला कळवा ! हिंदु राष्ट्रात जनतेचे रक्षण करणारे आणि तिला योग्य न्याय देणारे पोलीस असतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

या घटनेसंदर्भात हिंदु राष्ट्र सेना (नगर) आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (नगर) यांच्या वतीने १५ ऑक्टोबर या दिवशी उपजिल्हाधिकारी पालवे यांना धर्मांध आणि पोलीस यांच्यावर कारवाई करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. धर्मांध आरोपी हे सराईत गुन्हेगार आणि गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस हे या घटनेविषयी चालढकल करत असून हिंदुत्वनिष्ठांवरच कारवाई करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असे निवेदनात म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​