Menu Close

पुणे येथे नवरात्रोत्सवाच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्यासंदर्भात निवेदने

baban_khodade
पोलीस निरीक्षक बबन खोडदे यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

पुणे, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रोत्सवाच्या कालावधीत होणारे अपप्रकार रोखले जावे, तसेच हा उत्सव धार्मिक वातावरणात आणि धर्मशास्त्रानुसार साजरा व्हावा, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन खोडदे, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, तसेच श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. या वेळी बबन खोडदे यांनी याच आशयाची नोटीस परिसरातील मंडळांना दिली असल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *