हिंदूंना कपाळावर टिळा लावण्याचे आवाहन

मुंबई – महाराष्ट्रातील नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुसलमानांना प्रवेशबंदी करण्याचा मोठा निर्णय विश्व हिंदु परिषदेने घेतला आहे. उत्सवकाळात आयोजकांनी काय करावे आणि करू नये ?, याची सूचीही देण्यात आली आहे. हिंदूंची ओळख पडताळण्यासाठी उपस्थितांची आधार कार्ड पडताळणी करून कपाळावर टिळा लावण्याचे आवाहनही परिषदेने केले आहे.
‘हा सण देवीच्या उपासनेचा आहे. मूर्तीपूजेच्या विरोधात असलेल्या मुसलमानांनी या सणात का सहभागी व्हावे ?’, असे परिषदेने घोषित केले आहे.
धर्मरक्षणासाठी कार्यरत राहून स्तुत्य निर्णय घेणार्या विश्व हिंदु परिषदेचे अभिनंदन ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







