-
धर्मांधांनी गणेशोत्सव मंडळ आणि गणेशमूर्ती यांना हानी पोचवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण
-
धर्मांधांना सोडून पीडित हिंदूंनाच नोटीस बजावली !

मुंबई – परळ येथे ईद साजरी करून परतणार्या धर्मांधांनी हिंदूबहुल भागात घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला होता. धर्मांधांनी गणेशोत्सव मंडळ आणि गणेशमूर्ती यांना हानी पोचवण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी नायगाव परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना भोईवाडा पोलीस ठाण्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. २७ ऑगस्ट या दिवशी नोंदवलेल्या एका गुन्ह्याच्या अन्वेषणाच्या दृष्टीने तथ्य आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
🚨 Police notice issued to Hindu activists of a Ganeshotsav Mandal in Naigaon, Mumbai, even as the Mandal and Ganesha murti faced threats of harm by fanatics!
📌 Why are notices being served to the victim Hindus instead of those accused of creating tension?#Mumbai #Ganeshotsav pic.twitter.com/TPHOiWn2dl
— Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat) September 3, 2026
पोलिसांची धमकीवजा नोटीस !
नोटिसीनुसार पुराव्यांशी कोणतीही छेडछाड केली जाणार नाही, प्रकरणाची वस्तूस्थिती ठाऊक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा साक्षीदाराला न्यायालय किंवा पोलीस यांच्यापासून तथ्ये लपवण्यासाठी कोणतीही धमकी, प्रलोभन अथवा वचन दिले जाणार नाही, अन्वेषणाच्या काळात सर्व आवश्यक कागदपत्रे आणि साहित्य पोलिसांसमोर सादर करावे लागेल आणि कोणतीही माहिती न लपवता सत्य उघड करावे लागेल, भविष्यात कोणताही गुन्हा केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल, आदी सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या अटींचे पालन न केल्यास किंवा चौकशीला उपस्थित न राहिल्यास संबंधितांवर अटकेची कारवाई केली जाऊ शकते, अशी चेतावणीही पोलिसांनी दिली.
संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या हिंदूंवर गुन्हे नोंदवले जाणे गंभीर ! – राजीव चौबे, विभाग मंत्री (मुंबई शहर), विश्व हिंदु परिषद

आमच्या घरांसमोर येऊन जिहादी धर्मांधांकडून दादागिरी, गुंडागिरी करत घोषणा दिल्या गेल्या किंवा हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला, तर अशा वेळी हिंदू आत्मरक्षणासाठी प्रतिकार करणारच. स्वतःच्या, तसेच माता-भगिनी आणि कुटुंब यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणारच. अशा वेळी त्यांच्यावरच गुन्हे नोंदवून पोलिसांकडून नोटिसा दिल्या जात असतील, तर हे गंभीर आहे. हिंदूंवर होणारा हा अन्याय असून विश्व हिंदु परिषद सदैव हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.
पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्यास आंदोलन करू ! – रोहित नावजी माने, सह मंत्री, परळ जिल्हा, विश्व हिंदु परिषद
परळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भोईवाडा पोलिसांनी अक्षय क्षीरसागर यांना कलम ३५(३) ची नोटीस बजावली आहे. हिंदु समाज किंवा आमचे कार्यकर्ते अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा कार्यकर्त्यांनाच लक्ष्य करणे चुकीचे आहे. आम्ही कायद्याचा आदर करतो आणि अन्वेषणालाही सहकार्य करू; पण कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली जर कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तर विश्व हिंदु परिषद शांत बसणार नाही. पोलिसांनी एकतर्फी कारवाई न करता सत्य समोर आणावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.
कार्यकर्त्यांना लक्ष्य करून दबावाचे राजकारण झाल्यास लोकशाही मार्गाने विरोध करू ! – यशवंत पोळ, खजिनदार, राजारामवाडी आणि संलग्न परिसर सार्वजनिक उत्सव मंडळ
अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. हिंदु समाजाच्या प्रश्नांसाठी किंवा अन्यायाच्या विरोधात भूमिका मांडणार्या कार्यकर्त्यांनाच वारंवार लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा गंभीर विषय आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला न जुमानता निष्पक्षपणे अन्वेषण करून सत्य समोर आणावे, हीच आमची अपेक्षा आहे. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे ही आमची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहील ! कार्यकर्त्यांना लक्ष्य करून दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर चौकटीत त्याचा ठामपणे विरोध करू.
पोलिसांकडून खोटी माहिती आणि टाळाटाळ !
नोटिसीविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी भोईवाडा पोलीस ठाण्याच्या एका अधिकार्यांना दूरभाषद्वारे संपर्क केला असता त्यांनी नोटीस पाठवली नसल्याची खोटी माहिती दिली, तर अन्य अधिकार्यांनी ‘वरिष्ठ अधिकारी बाहेर गेले आहेत’, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.
नोटीस दिलेल्या हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य देणार ! – राजीव चौबे, विश्व हिंदु परिषद
हिंदुत्वनिष्ठ निरपराध असतांना त्यांना अशा प्रकारे नोटीस पाठवणे चुकीचे आहे. या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आम्ही भायखळा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेतली आहे. ‘नोटीस देण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठाला आम्ही कायदेशीर साहाय्य करणार आहोत’, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदु परिषदेचे श्री. राजीव चौबे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
हिंदूबहुल भागात जाणूनबुजून घोषणा देऊन उन्माद माजवणार्या धर्मांधांवर कोणतीच कारवाई आणि निरपराध हिंदूंना मात्र नोटीस बजावणे संतापजनक ! पोलिसांचा हा दुटप्पीपणा जाणा ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







