स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा !

प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. मुलांनो, तुमच्या शाळेत, शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच नाही ना ! केवळ ईश्वरात एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे. सतत आनंदी रहाणे, हा ईश्वराचा स्वभाव आहे. त्याच्यासारखे आनंदी होण्यासाठी कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे, ते आपण पाहूया. पुढे काही दोष आणि त्यांच्या विरुद्ध असलेले गुण यांची सूची (यादी) दिली आहे. पुढे दोषांची वर्गवारी ढोबळमानाने केलेली आहे. कोणता दोष अधिक त्रासदायक आणि कोणता अल्प त्रासदायक, हे ठरवता येण्यासाठी ही वर्गवारी केली आहे. वर्गवारी केलेल्या प्रत्येक गटामधील दोषांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे, दोषांपैकी त्यातल्या त्यात अधिक त्रासदायक ठरू शकतील, असे दोष प्रथम घेऊन अल्प त्रासदायक ठरू शकतील, असे दोष उतरत्या क्रमाने घेतले आहेत. प्रत्येकाची प्रकृती आणि स्वभावदोष यांनुसार प्रत्येकाच्या संदर्भात ही वर्गवारी थोडीफार पालटू शकते, उदा. सूचीत दिलेला स्वतःला अधिक त्रासदायक ठरू शकणारा दोष एखाद्याला अल्प त्रासदायक वाटू शकेल आणि सूचीत दिलेला स्वतःला अल्प त्रासदायक ठरू शकणारा दोष एखाद्याला अधिक त्रासदायक वाटू शकेल. आता आपण गुण-दोषांची सूची (यादी) पाहूया.

१. इतरांना अधिक त्रासदायक ठरू
शकतील, असे दोष आणि त्याविरुद्ध असणारे गुण

दोष गुण
अ. विध्वंसक वृत्ती विधायक कार्य करणे
आ. भांडखोरपणा दुसर्‍यांशी जुळवून घेणे आणि क्षमाशीलता
इ. रागीटपणा समजूतदारपणा आणि प्रेमळपणा
ई. चिडचिडेपणा संयम आणि शांतपणा
उ. उद्धटपणा नम्रपणा
ऊ. दुसर्‍यांना तुच्छ लेखणे दुसर्‍यांचा आदर करणे
ए. दुसर्‍यांवर टीका करणे दुसर्‍यांचा आदर करणे
ऐ. आदरातिथ्य न करणे आतिथ्यशील असणे
ओ. दुसर्‍यांना दोष देणे दुसर्‍यांना समजून घेणे
ए. पूर्वग्रहदूषित असणे पूर्वग्रह नसणे आणि सतत वर्तमानकाळात रहाणे
ऐ. हट्टीपणा दुसर्‍यांशी जुळवून घेणे, ऐकण्याची वृत्ती असणे,
इतरांच्या इच्छेनुसार वागणे,नकारात्मक मत न बनवणे
ओ. लहरीपणा नियमितपणा,निश्चितता, सातत्य
औ. वेळेचे पालन न करणे वेळेचे पालन करणे

२. स्वत:ला अधिक त्रासदायक ठरू
शकतील, असे दोष आणि त्याविरुद्ध असणारे गुण

दोष गुण
अ. हेवा वाटणे दुसर्‍याचे कौतुक वाटणे, दुसर्‍याकडून शिकण्याची वृत्ती असणे, निर्लोभी असणे
आ. मत्सर वाटणे दुसर्‍याचे कौतुक वाटणे, मत्सर न वाटणे, दुसर्‍याला प्रोत्साहन देणे, वैरभाव
इ. संशयीपणा निःशंकपणा, संशय न घेणे, सुरक्षितपणाची भावना असणे, दुसर्‍यावर विश्वास
ई. दुसर्‍यांच्याचुका पहाणे स्वतःच्या चुकांकडे लक्ष देणे, टीका न करणे
उ. आज्ञापालन न करणे आज्ञाधारकपणा
ऊ. लाज वाटणे निःसंकोचपणा, सभाधीटपणा
ए. अव्यवस्थितपणा व्यवस्थितपणा

३. स्वत:ला अल्प त्रासदायक ठरू शकतील,
असे दोष आणि त्याविरुद्ध असणारे गुण

दोष गुण
अ. आळशीपणा तत्परता, उद्योगी
आ. एकाग्रता नसणे एकाग्रता असणे
इ. आत्मविश्वास नसणे आत्मविश्वास असणे
ई. निर्णयक्षमता नसणे निर्णयक्षमता असणे
उ. पुढाकार न घेणे पुढाकार घेणे, संकोच न करणे,
ऊ. माघार न घेणे न डगमगणे
ए. चिकाटीचा अभाव चिकाटी असणे
ऐ. अनावश्यक बोलणे मितभाषी असणे, आवश्यक तेवढेच बोलणे
ओ. स्वार्थीपणा निःस्वार्थीपणा, परोपकारी वृत्ती
औ. संकुचित असणे व्यापक असणे
अं. आत्मकेंदि्रतपणा(केवळ स्वतःचाच विचार करणे) इतरांचा विचार करणे किंवा व्यापक असणे
क. स्वतःच्या वस्तू इतरांना न देणे त्यागी असणे
ख. दान न करणे दानशूरपणा
ग. दुसर्‍यांविषयी काहीही न वाटणे दुसर्‍यांविषयी आस्था असणे, स्नेहभाव, प्रीती (निरपेक्ष प्रेम)

मुलांनो, वरील दोषांपैकी काही दोष तुमच्यामध्ये आहेत, असे तुम्हाला वाटते ना ! तर मग पुढीलसूत्रांनुसार कृती करा.

१. वरील सूचीतील जे दोष तुमच्यात आहेत, त्यांची एक सूची करा.

२. वरील सूचीत असलेल्या दोषांव्यतिरिक्त अन्य दोष तुमच्यात असतील, तर तेही तुम्ही केलेल्या सूचीतनमूद करा.

३. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-परिवार इत्यादींना तुम्ही केलेल्या सूचीतील दोष दाखवून त्याव्यतिरिक्त अन्य दोष असतील, तर तेही सांगण्याची त्यांना विनंती करा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’

Leave a Comment