स्वभावदोष-निर्मूलन सारणी कशी लिहावी ?

बालमित्रांनो, आता आपण स्वभावदोष-निर्मूलन सारणी (तक्ता) कशी भरावी, हे जाणून घेऊया.

१. स्वभावदोष-निर्मूलन सारणीचे स्वरूप

दिवसभरातील चुका लिहिण्यासाठी एका वहीत पुढीलप्रमाणे स्वभावदोष-निर्मूलन सारणी आखावी. वहीच्या दोन पानांचे भाग केल्यावर पहिल्या पानावर पहिले तीन स्तंभ आखावेत आणि दुसर्‍या पानावर स्तंभ क्रमांक ४ ते ६ आखावेत.

२. सारणी लिहिण्याची पद्धत

अ. स्तंभ १ – चूक

‘चूक, अयोग्य कृती, अयोग्य प्रतिक्रिया किंवा विचार’ हा स्तंभ पहिला असल्याने यात आरंभी तिथी आणि कंसात दिनांक, या पद्धतीने आडवे लिहावे.

१. स्वतःच्या लक्षात आलेल्याअन् इतरांनी लक्षात आणून दिलेल्या दिवसभरातील चुका, अयोग्य कृती, अयोग्य विचार, तसेच अयोग्य प्रतिक्रिया या स्तंभात लिहाव्यात. चूक जर दुसर्‍याने लक्षात आणून दिली असेल, तर तसाही उल्लेख करावा.

२. झालेल्या चुकीचा लक्षात आलेला परिणामही लिहावा.

आ. स्तंभ २ – कालावधी

यामध्ये चूक, अयोग्य कृती, अयोग्य प्रतिक्रिया किंवा विचार झाल्यावर त्याची किती वेळाने स्वतःला जाणीव झाली, ते लिहावे. पुढील दोन उदाहरणांवरून हे लक्षात येईल.

अ. ‘अभ्यास करून झाल्यावर पटलावरील (टेबलावरील) साहित्य आवरून ठेवले नाही’, हे एखाद्या मुलाला ३ घंट्यांनी (तासांनी) लक्षात आल्यास सारणीत ही चूक लिहितांना ‘कालावधी’ या स्तंभात ‘३घंटे’ असे लिहावे.

आ. आईविषयी एखाद्या मुलीच्या मनात १ घंटा राग होता, तर ‘कालावधी’ या स्तंभात तिने ‘१ घंटा’ असे लिहावे.

इ. स्तंभ ३ : स्वभावदोष

झालेल्या चुकीचा अभ्यास करून ‘ती चूक कोणत्या स्वभावदोषामुळे झाली’, हे शोधावे आणि तो दोष या स्तंभात लिहावा. काही चुका एकापेक्षा जास्त स्वभावदोषांमुळे होतात.त्या वेळी ते सर्व स्वभावदोष या स्तंभात लिहावेत.

ई. स्तंभ ४ : स्वयंसूचना /उपाय

योग्य कृती किंवा योग्य प्रतिक्रिया यांविषयी स्वयंसूचना /उपाय

अ. योग्य कृती, योग्य विचार किंवा योग्य प्रतिक्रिया असलेली स्वयंसूचना बनवून या स्तंभात लिहावी.

आ. चूक टाळता येण्यासाठीचा उपाय लक्षात आल्यास तोही या स्तंभात लिहावा. समजा, एखाद्या मुलाच्या हातातून खोबरेल तेलाची बाटली पडून ती फुटली असेल, तर या प्रसंगात ‘धांदरटपणा’ हा दोष असल्यास त्या संबंधाने त्याने स्वयंसूचना लिहावी, तसेच ‘काचेच्या बाटलीच्या स्थानी प्लास्टिकची बाटली वापरीन’,हा उपाय लिहावा आणि कृतीतही आणावा.

उ. स्तंभ ५ : दिवसभरातील सूचनासत्रांची संख्या

दिवसभरात केलेल्या स्वयंसूचनेच्या सत्रांची संख्या लिहितांना वेळही (उदा. सकाळी ७ वाजता पहिले सत्र, सकाळी १०.३० वाजता दुसरे सत्र, दुपारी२ वाजता तिसरे सत्र, सायंकाळी ५ वाजता चौथे सत्र इत्यादी.) नमूद करावी.

ऊ. स्तंभ ६ : प्रगती

येथे संबंधित दोष घटण्याच्या संदर्भात प्रगती झाल्याचे लक्षात आल्यास तसेलिहावे, उदा. पूर्वी संबंधित चुकीची जाणीव इतरांनी करून द्यावी लागत होती; पण आता त्या चुकीचीजाणीव स्वतःलाच होत आहे. ज्या दिवशी काही प्रगती लक्षात येईल, त्याच दिवशी ‘प्रगती’ हा स्तंभभरावा. अशा वेळी ‘प्रगती’च्या आधीचे सारणीतील सर्व आडवे स्तंभ मोकळे रहातील.

मुलांनो,स्वयंसूचनांद्वारे मनाला दोषांची जाणीव करून दिल्याने कधी कधी निरुत्साह जाणवण्याची शक्यता असते.प्रगतीच्या स्तंभात प्रगतीची नोंद केल्याने स्वभावदोष घालवण्यासाठी तुमच्या मनाला प्रोत्साहन मिळेल अन्निरुत्साह जाणवणार नाही. ज्या दिवशी प्रगतीच्या स्तंभात लिहिण्यासारखे काही नसेल, तेव्हा तो उभा स्तंभ मोकळा सोडावा. त्या स्तंभात ‘नाही, काही नाही’, असे लिहू नये. ‘नाही, काही नाही’, असे लिहिल्याने सारणी लेखन करणार्‍याला नैराश्य येऊ शकते.

३. सारणीलेखनाचे उदाहरण

‘सारणी कशी लिहावी’, ते लक्षात येण्‍यासाठी एका विद्यार्थी-साधकाने लिहिलेली एका दिवसाची सारणी उदाहरण म्‍हणून पुढे देत आहोत.

टीप १ – हिंदु कालगणनेनुसार दिनांक लिहिण्‍याची ही आदर्श पद्धत आहे. यावरून हिंदु संस्‍कृतीची जाणीव होते; पण सारणीलिखाण करणारा आपल्‍या सोयीनुसार दिनांक लिहू शकतो.

मुलांनो, आपणही आज पासूनच स्वभावदोष-निर्मूलनसारणी लिहूया आणि गुरुकृपा संपादन करूया !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’