स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया म्हणजे काय ?

१. व्याख्या

‘स्वभावदोष-निर्मूलन’ म्हणजे स्वभावदोष दूर करणे. ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजेस्वभावदोष दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियमित अवलंबण्याची एक विशिष्ट प्रक्रिया होय.

२. स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व

२ अ. सुखी आणि आदर्श जीवन जगता येणे : स्वभावदोषांमुळे कोणती हानी होते, हे आतापर्यंतच्या मागील लेखांतून तुमच्या लक्षात आले असेल. स्वभावदोषांमुळे जीवन दुःखी आणि निराशाजनक होते.स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण मिळवता येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणूनजीवन सुखी आणि आदर्श बनते.

२ आ. स्वभावदोष दूर केल्यासच व्यक्तीमत्त्वाचा खरा विकास साधता येणे : अनेक मुले स्वतःचेव्यक्तीमत्त्व आदर्श घडवण्यासाठी उच्चशिक्षण घेणे, आवडत्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करणे,विविध भाषांचे अध्ययन करणे, स्पर्धा-परीक्षांना बसणे, व्यायाम आणि खेळ यांद्वारे शरीरयष्टी सक्षम करणेयांसारखे विविध मार्ग अवलंबतात. मुलांनो, अनेक स्वभावदोष असलेले व्यक्तीमत्त्व कोणाला आवडेलका ? खरे पहाता, स्वतःतील भित्रेपणा, अबोलपणा, इतरांचा विचार न करणे यांसारखे स्वभावदोष दूरकेल्यामुळे व्यक्तीमत्त्वाचा खरा विकास होतो. असे दोषरहित व्यक्तीमत्त्वच समोरील व्यक्तींवर किंवासमाजात ठसा उमटवू शकते. व्यक्तीमत्त्वाचा विकास होण्यासाठी स्वभावदोष घालवणे अपरिहार्य ठरते.

२ इ. जीवनातील कठीण प्रसंगांना सहजपणे तोंड देता येणे : अनेक मुलांचे कठीण प्रसंगात मानसिक संतुलन बिघडते. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे मन एकाग्र आणि खंबीर होण्यासहविवेकबुद्धीही जागृत होते. त्यामुळे कठीण प्रसंगातही स्थिर रहाता येण्यासह अयोग्य किंवा अविचाराने कृतीकरण्यापासून मनाला रोखता येते.

२ ई. स्पर्धात्मक युगात पुढे (अग्रस्थानी) रहाता येणे : स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे मनाची शक्ती अनावश्यक गोष्टींवर व्यय (खर्च) होत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा परिपूर्णवापर होतो आणि सध्याच्या स्पर्धात्मक युगात पुढे (अग्रस्थानी) रहाता येते.

बालमित्रांनो, आपल्या आयुष्यात स्वभावदोष-निर्मूलनाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन स्वभावदोष-निर्मूलन करण्याचा दृढनिश्चय करूया.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दोष घालवा आणि गुण जोपासा !’