Menu Close

ख्रिस्ती पत्नीचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह केल्याचा मुसलमान पतीवर आरोप !

लव्ह जिहाद’ला बळी पडल्याचे ख्रिस्ती महिलेचे आणखी एक उदाहरण !

  • केवळ हिंदु युवती अथवा महिलाच नव्हेत, तर अनेक ख्रिस्ती महिलाही लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. एरव्ही ख्रिस्त्यांची तळी उचलणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या प्रकरणावर काही बोलतील का ?
  • ‘लव्ह जिहाद’ हे षड्यंत्र नसून थोतांड आहे’, असे बरळणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ? -संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

एर्नाकुलम (केरळ) – येथील एका ख्रिस्ती महिलेने तिच्या मुसलमान पतीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. पीडितेने, ‘मुसलमान व्यक्तीशी विवाह करण्यासाठी मला काही दिवस एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे मला त्याचाशी विवाह करावा लागला’, असे सांगितले. पुढे काही दिवसांसाठी सदर महिला माहेरी गेल्यानंतर परतली नसल्याने मुसलमान पतीने तिला परत बोलावण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयाने ही याचिका योग्य नसल्याचे कारण देत फेटाळली आहे.

पोलिसांनी मुसलमान पतीने तक्रार नोंदवल्यावर ख्रिस्ती पत्नीच्या अल्लपुळा येथील माहेरी जाऊन तिची चौकशी केली असता वरील सत्य समोर आले. ख्रिस्ती महिलेची आता एकटी रहाण्याचीच इच्छा असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *