Menu Close

बांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशात हिंदू असुरक्षित !

ढाका – नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा येथील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बांगलादेशमधील नावगांव जिल्ह्यात असलेल्या पटनीताला येथील काशीपूर गावात अबुल नावाच्या मुसलमानाने उत्तम महंत नावाच्या हिंदु शेतकर्‍याचे अपहरण केले. अबुल याने महंत यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. ‘काफिरांना मारून टाकले, तरी आम्हाला काहीही होणार नाही’, अशी प्रतिक्रिया अबुल याने या वेळी व्यक्त केली, असे वृत्त ‘हिंदु संगबाद’ या वृत्तसंकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.

हिंदु परिचारिकेवर बलात्कार करून तिची हत्या

ढाका येथील किशोरगंज जिल्ह्यातील ‘युनायटेड हॉस्पिटल’चे डॉक्टर हनीफुर रहमान याने एका हिंदु परिचारिकेवर बलात्कार करून तिची हत्या केली. शवविच्छेदनाच्या वेळी तिच्या गुप्तांगावर रक्ताचे डाग आढळले, असे वृत्त ‘संगबाद’ या बंगाली दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *