Menu Close

हिंदु जनजागृती समितीने घेतली ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांची भेट !

विवेक अग्निहोत्री (उजवीकडे) यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक दाखवतांना समितीचे श्री. पराग गोखले

पुणे – काश्मिरी हिंदूंवरील आघातांना वाचा फोडणार्‍या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात ११ मार्च या दिवशी ‘प्री स्क्रीनिंग’ (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निमंत्रित लोकांना तो दाखवणे) झाले. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, तसेच अभिनेते दर्शन कुमार उपस्थित होते. चित्रपटानंतर त्यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधला. त्या निमित्ताने चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी विवेक अग्निहोत्री यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. पराग गोखले यांनी हिंदु जनजागृती समितीने काश्मिरी हिंदूंविषयी केलेल्या कार्याची, तसेच या चित्रपटाला दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदुत्वाच्या भूमिकेतून दिलेली प्रसिद्धी, यांविषयीची माहिती विवेक अग्निहोत्री यांना दिली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *