दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांच्या विरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ !
  • भारतीय चलनाविषयी अपसमज पसरवणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी !
  • जळगाव, संभाजीनगर, नगर, नांदेड, परभणी येथे प्रशासनास निवेदन !
जळगाव येथील निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

जळगाव – भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची दहा रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. प्रत्यक्षात मात्र दहा रुपयांची सर्व नाणी वैध असूनही समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी दहा रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात. तरी ही नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांविरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी, अशा आशयाची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, संभाजीनगर, नगर, परभणी, नांदेड येथील प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

नगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

निवेदनात म्हटले आहे की,

१. नागरिकांना याविषयी स्पष्टता नसल्याने त्यांच्याकडे दहा रुपयांची नोट देण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नसतो. तसेच त्यांच्याकडे केवळ नाणी असल्यास त्यांच्या खरेदीवर बंधने येतात आणि त्यांची गैरसोय होऊन मनस्ताप होतो.

२. १७ जानेवारी २०१८ या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेने ही नाणी स्वीकारण्याच्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अनेक लोक ही नाणी नाकारतात.

३. ‘नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे निर्देशही भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करून संबंधित दुकानदार, विक्रेते यांच्याविरुद्ध तक्रार केल्यास शिक्षेचे प्रावधानही आहे.

४. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी जे आदेश दिले आहेत, ते सर्व दुकानदार, विक्रेते यांच्यापर्यंत पोचवावेत.

५. नागरिकांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, स्थानिक केबल नेटवर्क, होर्डिंग, प्रसिद्धीपत्रक इत्यादी माध्यमांतून व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी.

६. अडवणूक करणार्‍यांवर तत्परतेने कार्यवाही करावी.

परभणी येथे अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

या प्रसंगी जळगाव येथे धर्मप्रेमी श्री. राहुल घुगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दुर्गाप्रसाद पाटील, श्री. उमेश जोशी, श्री. प्रशांत जुवेकर; संभाजीनगर येथे सर्वश्री जयसिंग होलीये, प्रकाश कुलकर्णी, रामेश्वर मते; परभणी येथे धर्मप्रेमी अधिवक्ता सर्वश्री अमोल व्यास, लखन व्यास, सुमित पाचलिंग, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीनिवास दिवाण आणि नांदेड येथे धर्मप्रेमी श्री. सोपान सोनटक्के, श्री. मधुकर भरडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश कोंडलवार उपस्थित होते.

संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​