Menu Close

मध्यप्रदेशातील शाळेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘करीना-सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय ?’, असा प्रश्न विचारल्याने शाळेला नोटीस

खांडवा शहरामधील ‘अ‍ॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल’ची प्रश्‍नपत्रिका

निमार (मध्यप्रदेश) – खांडवा शहरामधील ‘अ‍ॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल’च्या प्रश्‍नपत्रिकेत ‘करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव काय ?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावरून टीका झाल्यानंतर शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासमवेतच शालेय शिक्षण विभागाने कारवाई केल्याचे सांगितले आहे.

अ‍ॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलने इयत्ता सहावीच्या मुलांना परीक्षेत हा प्रश्‍न विचारला होता. शाळेच्या या प्रश्‍नावर पालक शिक्षक संघाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, तर ‘शाळेला प्रश्‍न विचारायचाच होता, तर महापुरुषांविषयी विचारले असते’, असे म्हटले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *