Menu Close

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध !

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे

संभाजीनगर – शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे. दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांची लिखाणाच्या माध्यमातून अपर्कीती केली आहे’, असा आरोप करत ‘पुरंदरे यांच्या अस्थींचे कोणत्याही गडावर विसर्जन करू देणार नाही’, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

‘११ किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाचा प्रयत्नही कुणी करू नये. तसा प्रयत्न केल्यास त्याला संभाजी ब्रिगेडच्या पद्धतीने धडा शिकवला जाईल. त्यांचा गडावरून कडेलोटही होऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचे दायित्व सर्वस्वी सरकारचे असेल’, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

Read more on Featured News

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *