Menu Close

केरळमध्ये हिंदु तरुणाने ख्रिस्ती तरुणीशी विवाह केल्याने तिच्या भावाकडून हिंदु तरुणाला मारहाण

जर ख्रिस्ती तरुणाने हिंदु तरुणीशी विवाह केला असता आणि तिच्या भावाने मारहाण केली असती, तर ती ‘राष्ट्रीय बातमी’ ठरली असती अन् एकजात सर्व निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष यांनी हिंदूंना तालिबानी ठरवले असते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

प्रतिकात्मक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथे धर्मांतरास नकार दिल्याने मिथुन कृष्णा नावाचा तरुण, त्यांची पत्नी, भाऊ आणि मित्र यांना ख्रिस्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यात मिथुन यांच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना ३१ ऑक्टोबर या दिवशी येथील चिरायंकीझू बीच रोडजवळ घडली.

२९ ऑक्टोबर या दिवशी मिथुन यांनी दीप्ती या २४ वर्षीय ख्रिस्ती तरुणीशी विवाह केला. त्यास दीप्ती यांच्या कुटुंबियांनी विरोध होता. दीप्ती यांचा भाऊ दानिश याने मिथुन यांना घरी बोलावले होते. मिथुन घरी आल्यावर दानिश याने मिथुन यांना धर्मांतर करण्यास सांगितले. त्यास मिथुन यांनी नकार दिला, तेव्हा दानिश याने मिथुन, त्यांचा भाऊ, पत्नी दीप्ती आणि मित्र यांना मारहाण केली. या घटनेनंतर दानिश पसार झाला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *