Menu Close

गंगा नदीतून वाहून येणार्‍या मृतदेहांवर पोलिसांकडून टायर आणि पेट्रोल यांद्वारे अंत्यसंस्कार !

५ पोलीस निलंबित

बलिया (उत्तरप्रदेश) – पोलिसांकडून गंगा नदीतून वाहून येणारे मृतदेह बाहेर काढून टायर आणि पेट्रोल यांद्वारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ५ पोलिसांना निलंबित केले. उत्तरप्रदेशमधील वाराणसी, गाजीपूर आणि बलीय, तसेच बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहून आल्याचे प्रकार घडले.

यानंतर उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाकडून हे मृतदेह काढून त्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या वेळी वरील प्रकार घडला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *