Menu Close

कर्नाटक : मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तिच्या कुटुंबियांकडून हत्या

लव्ह जिहादला नाकारून त्याला ‘प्रेम’ म्हणणारे तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी का बोलत नाहीत कि ‘जे घडले, तेच योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?

बेंगळुरू (कर्नाटक) – मुसलमान तरुणीशी प्रेम करणार्‍या के. लक्ष्मीपती या हिंदु तरुणाची तरुणीचे वडील निजामुद्दीन याने हत्या केली. या प्रकरणी निजामुद्दीन आणि त्याचा मुलगा सिकंदर यांना अटक केली आहे. यातील इब्रत आणि महंमद हे दोघे आरोपी पसार आहेत.

विवाहाची बोलणी करण्यासाठी निजामुद्दीन याने लक्ष्मीपती याला बोलावले होते. त्या वेळी लक्ष्मीपतीचा भाऊ नटराज हाही उपस्थित होता. बोलणीच्या वेळी लक्ष्मीपती याची गळा दाबून हत्या करण्यात आली. हे पाहून नटराज तेथून पळून गेला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *