Menu Close

हिंदु धर्मविरोधी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या विरोधात धर्मप्रेमींकडून ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट

धनबाद (झारखंड) : सध्या ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आघात करण्यात येत आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या माध्यमातून हिंदु धर्माचे बलस्थान असणार्‍या आश्रम व्यवस्थेची मानहानी केली आहे. या षड्यंत्राच्या विरोधात झारखंड राज्यातील धनबाद येथील धर्मप्रेमी श्री. अभिनव कुमार आणि कतरास भागातील श्री. दीपक केसरी यांनी या वेब सिरीजच्या विरोधात ‘ऑनलाईन’ ‘एफ्.आय.आर्.’ (प्रथमदर्शी माहिती अहवाल) प्रविष्ट केला. ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी श्री. केसरी यांचे कौतुक करतांना ‘तुम्ही चांगले कार्य करत आहात’, असे म्हटले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *