Menu Close

धर्मांधाशी विवाह केल्यानंतर हिंदु युवतीचा घरातील धर्मांधांकडून छळ, पोलिसांकडे तक्रार

Love_jihad_M

नांदेड : येथील एका धर्मांधाशी लग्न झालेल्या हिंदु युवतीने घरातील धर्मांधांकडून हुंडा मागून छळ केला जात असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांकडे प्रविष्ट केली आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदु युवती धर्मांधांच्या आमिषाला बळी पडतात. अशा धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही युवती सध्या तिच्या आई-वडिलांसमवेत रहाते.

१. त्या हिंदु युवतीने आदील अब्दुल कादर या युवकाशी लग्न केले.

२. लग्न करतांना युवतीकडून उर्दूमध्ये लिहिलेल्या अनेक कागदपत्रांवर आणि कोर्‍या कागदांवर स्वाक्षर्‍या घेतल्या. तिचे त्या धर्मांधाशी असलेले प्रेमप्रकरण सर्वांना माहिती झालेले असल्याने तिला वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात होत्या.

३. पोलीस आणि न्यायालय यांच्यासमक्ष काही म्हटलीस, तर तुझ्या आई-वडिलांचे तुकडे पाडू, अशी धमकी दिली.

४. लग्नानंतर तिला त्रास देणार्‍यांमध्ये तिचा नवरा आदील अब्दुल कादर, सासरा अब्दुल कादर शेख, सासू साजीदा अब्दुल कादर यांसह घरातील १२ जण होते. त्या सर्वांकडून तिला किराणा दुकान चालू करण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, असे सांगून त्रास देण्यात येत होता.

५. शिवाजीनगर पोलिसांनी त्या १२ जणांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला असून अद्याप त्या आरोपींना अटक केलेली नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *