Menu Close

नालासोपारा : राष्ट्रध्वाच्या अवमानाच्या विरोधात पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

मुंबई : राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी शर्ट आणि राष्ट्रध्वजाप्रमाणे असलेले तिरंगा मास्क यांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी नालासोपारा (पूर्व) आणि नालासोपारा (पश्‍चिम) येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या वेळी योग वेदांत सेवा समितीचे सर्वश्री राजू बरनवाल, उदय शुक्ला, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद काळे यांसह सर्वश्री प्रमोद वर्मा, सतीश ठाकूर, नीलेश बने, कृणाल रायछडा हे राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते. नालासोपारा पश्‍चिम पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक माहिमतुरा आणि नालासोपारा पूर्व पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक न.ल. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *