Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे आणि सनातन संस्थेकडून सोलापूर येथे श्रद्धांजली !

पालघर येथे संतांच्या हत्येचे प्रकरण

कोल्हापूर : महाराष्ट्रातील पालघर येथे हिंसक जमावाने १६ एप्रिलच्या रात्री पू. कल्पवृक्ष गिरीजी महाराज आणि पू. सुशील गिरीजी महाराज या दोन हिंदु संतांसह त्यांच्या वाहनचालकाची नृशंस हत्या केली. २८ एप्रिलच्या आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्त या संतांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी शाहूपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्राबाहेर सायंकाळी दिवा लावला. तसेच सोलापूर सेवाकेंद्र येथे सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी सायंकाळी दिवा लावला.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *