
कोल्हापूर – हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरलेल्या धर्मांतरबंदी कायद्याला राज्यशासनाने संमती दिल्याविषयी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकल हिंदु समाज कोल्हापूर आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सन्मानपत्र प्रदान देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला, तसेच चाफ्याच्या फुलांचा हार अर्पण करून त्यांचा गौरव केला.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना आमदार श्री. राजेश क्षीरसागर, भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे झालेल्या हिंदु धर्म परिषदेत धर्मांतर बंदी कायद्याविषयी ठराव क्रमांक ७ संमत करण्यात आला होता. हिंदु समाजाच्या या ठाम मागणीची शासनाने गांभीर्याने नोंद घेत धर्मांतरास प्रतिबंध करणारा कायदा संमत करून हिंदु जनभावनेचा सन्मान केला. या पार्श्वभूमीवर हा कृतज्ञता सन्मान आयोजित केला होता.
या वेळी ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळावावा’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते श्री. सुनील सामंत, उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, ‘हिंदु जागरण’च्या सहजिल्हा संयोजक डॉ. अश्विनी माळकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. कपिल कदम यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते.







