-
कट्टर हिंदुत्वनिष्ठ असल्याचा राग मनात धरून हत्या केल्याचा पत्नीचा आरोप
-
महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने पुकारला बेमुदत संप
-
४ धर्मांधांना अटक

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर ७ ऑगस्टला धर्मांधांनी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक आक्रमण केले. धीरज परदेशी हे महानगरपालिकेच्या पथदिव्यांचे काम करत असतांना ही घटना घडली. या आक्रमणात गंभीर घायाळ झालेले धीरज परदेशी यांचा उपचारांच्या वेळी ९ ऑगस्टला दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी हैदराबाद सिटी पोलिसांच्या कृती दलाच्या साहाय्याने पोलिसांनी कारवाई करत युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ‘सकल हिंदु समाजा’च्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेरच ठिय्या आंदोलन करत ‘शहर बंद’ची हाक दिली. यानंतर बाजारपेठांतील दुकाने तातडीने बंद करण्यात आली. महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनीही या घटनेच्या निषेधार्थ १० ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. !जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत महानगरपालिकेचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात येईल’, अशी घोषणा कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून ८० टक्के नागरी सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
“माझ्या नवऱ्याला का मारलं?” हिंदू कुटुंबाचा आक्रोश; पत्नीचा सवाल
धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने भावुक होत न्यायासाठी आक्रोश केला. “हिंदू म्हणून जन्माला आलो, हीच आमची चूक होती का? म्हणून माझ्या नवऱ्याला मारलं?” असा सवाल करत त्यांनी संताप आणि दुःख व्यक्त केले.… pic.twitter.com/RLdMyxX9l6
— Sudarshan मराठी (@SudarshanNewsMH) August 10, 2026
नेमके प्रकरण काय ?
कब्रस्तानात विद्युत खांबाचे काम चालू होते. या वेळी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर धर्मांधांच्या जमावाने जीवघेणे आक्रमण केले. या आक्रमणात धीरज यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत झाली. धीरज यांना मारहाण करून आरोपी पसार झाले. त्यांनी धीरज यांना मारहाण का केली ?, ते अद्याप समजू शकलेले नाही.
मुकुंदनगर परिसरातून जिहादला निधीपुरवठा होत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात धाव घेत धीरज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुकुंदनगर आणि गुलमोहर परिसरातून होणार्या जिहादला संशयास्पद निधीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला. या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
मुकुंदनगर परिसरातून जिहादला निधीपुरवठा होत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात धाव घेत धीरज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुकुंदनगर आणि गुलमोहर परिसरातून होणार्या जिहादला संशयास्पद निधीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला. या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
आरोपीला अटक झाल्याविना अंत्यविधी होऊ देणार नाही ! – आमदार संग्राम जगताप यांची चेतावणी
धीरज परदेशी यांचा मृतदेह ९ ऑगस्टला रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला होता; मात्र मुख्य आरोपीला अटक झाल्याविना अंत्यविधी होऊ देणार नाही, अशी चेतावणी आमदार संग्राम जगताप यांनी दिली. ‘मुख्य आरोपीला अटक झाली नाही, तर १० ऑगस्टला मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून ठेवीन’, अशीही चेतावणी त्यांनी दिली. हे वृत्त हाती येईपर्यंत अजून परदेशी यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला नव्हता.
मृत कंत्राटी कर्मचार्याच्या पत्नीचा गंभीर आरोप !
धीरज कट्टर हिंदुत्वनिष्ठ असल्याचा राग मनात धरून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. तसेच ज्या ठिकाणी धीरज यांना मारण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करणार असल्याची चेतावणी कुटुंबियांनी प्रशासनाला दिली आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांची बंदची चेतावणी !
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत बंदची चेतावणी दिली आहे. बंदच्या घोषणेदरम्यान हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. धीरज यांच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि राज्य राखीव दलाची तुकडी शहरात तैनात करण्यात आली आहे.
आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस, १० दिवसांची पोलीस कोठडी !
या प्रकरणातील आरोपींना ९ ऑगस्टला रात्री उशिरा न्यायालयात उपस्थित करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात आली होती. मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणासाठी नोटीस बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर, तसेच मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.







