Menu Close

‘यू ट्यूबर’कडून गुरु नानक यांचा अवमान : निहंगांनी गुरुद्वारामध्ये नेऊन क्षमा मागण्यास भाग पाडले !

गुरुग्राम (हरियाणा) – येथील ‘यु ट्यूबर’ ऋतिक चांदना शिखांचे पहिले गुरु श्री गुरु नानकदेव यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपणी केली. या घृणास्पद प्रकारानंतर शीख समुदायाचा संताप अनावर झाला. निहंगांनी ‘यु ट्यूबर’ ऋतिक चांदनाला पकडले आणि थेट गुरुद्वारामध्ये घेऊन गेले. तिथे सर्वांसमोर नाक घासायला लावून क्षमा मागण्यास भाग पाडले.

याआधी त्याने गाईला मांस (चिकन) खायला घालून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. त्यानंतर हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला होता. त्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हाही नोंदवला जावून त्याला अटक करण्यात आली होती.

हिन्दूंनीसुद्धा शिखांप्रमाणे जागरूक राहून देवी-देवता आणि संतांचा अनादर करणाऱ्यांच्या विरोधात अशाच प्रकारे कृती केली पाहिजे ! — संपादक, हिंदू जनजागृती समिती

Latest News