Menu Close

छत्तीसगडमध्ये सव्वा लाख ‘पार्थिव शिवलिंगां’च्या पूजेच्या मंगलमय प्रसंगी ५०० धर्मांतरित कुटुंबांचे सनातन धर्मात पुनरागमन

  • तुम्ही सनातनला डिवचले; आता सनातन तुम्हाला सोडणार नाही ! – प्रबल प्रताप सिंह जुदेव, भाजप

  • छत्तीसगडचा पाद्री अरुण पन्नालाल याने भगवान शिवाचे अश्लाघ्य विडंबन केल्याचे प्रकरण

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव

जांजगीर-चांपा (छत्तीसगड) – दुष्ट पाद्री अरुण पन्नालालने सनातनचा अपमान केला आहे. त्याने भगवान शिवांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. त्याने हे लक्षात घ्यावे की, सनातन कुणालाही चिथावणी देत नाही; परंतु जी व्यक्ती सनातनची श्रद्धा आणि संस्कृती यांना आव्हान देते, तिला मात्र सनातन कधीच सोडत नाही. अधर्म आणि सनातनविरोधी कृत्यांचे परिणाम काळच दाखवून देतो. जेव्हा विष्णूचे ‘सुदर्शन चक्र’ चालवले जाते, तेव्हा मोठमोठ्या अहंकाराचाही चुराडा होतो, असा घणाघात ‘अखिल भारतीय घर वापसी अभियाना’चे प्रमुख आणि छत्तीसगड भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी येथे केले.

‘राम मिलेंगे आश्रम’, ‘कुमार दिलीप सिंह जुदेव सनातन फाऊंडेशन’ आणि ‘सेवा न्याय उत्थान’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जुदेव संबोधित करत होते. या प्रसंगी धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

श्री. जुदेव पुढे म्हणाले की, सनातन धर्म ही केवळ एक श्रद्धा नसून तो भारताचा आत्मा, संस्कृती आणि जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. आपल्या मुळांशी जोडले जाणे, हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि ‘घर वापसी’ मोहीम हा या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने चालू असलेला एक निरंतर प्रयत्न आहे.

सवा लाख पार्थिव शिवलिंगांची निर्मिती आणि ५०० धर्मांतरित कुटुंबांचे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

कार्यक्रमात मंत्रोच्चारांच्या वेळी हात जोडून उभे असलेले मान्यवर

माता शबरींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि भगवान श्रीरामांची तपोभूमी असलेल्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील शिवरीनारायण येथे ‘राम मिलेंगे आश्रम’ (टेंडुवाधाम) आहे. येथे ५०० धर्मांतरित कुटुंबांना सन्मानपूर्वक त्यांच्या मूळ सनातन परंपरेत परत आणण्यात आले. ‘सावन महोत्सवा’चा भाग म्हणून आयोजित सव्वा लाख पार्थिव शिवलिंगांची निर्मिती आणि पूजेच्या दिव्य प्रसंगी वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह हा शुद्धीकरण सोहळा पार पडला.

सव्वा लाख शिवलिंगांची करण्यात आलेली पूजा

या प्रसंगी श्री. जुदेव यांनी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चार केले; तसेच धर्मांतरित कुटुंबांचे चरण-प्रक्षालन करून त्यांना सनातन संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात पुन्हा समाविष्ट केले.

धर्मांतरित महिलेचे पाय धुऊन तिला हिंदु धर्मात प्रवेश देतांना श्री. जुदेव

प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. अशोक हरिवंशी, श्रीमती अंजू गबेल, जगन्नाथ दादा, महात्यागी बाबा, शालिनी अत्री, ज्योती जैस्वाल, श्यामटा, भुवनेश्वरी साहू, माधुरी पांडे, शीलू साहू, लक्ष्मी पटेल, संतोषी साहू, दुर्गा बारेठ, पुष्पा साहू, पूर्णिमा गबेल, पुष्पा गबेल, परमेश्वरी सिदार, मीना साहू, अनिता कंवर, रोशनी राज, लक्ष्मी कंवर, नेम पटेल, लिमिश जैस्वाल (धर्मसेना), ब्रिजेश जैस्वाल, करण खुटे, नितीश वैष्णव, राजेश कुमार साहू, उज्जैन सिंह कंवर, अनिल गबेल, सरिता दुबे, कुत्री जांगडे, रूपेंद्र गबेल, अवधेश शुक्ला, भूपेंद्र सिंह, सुधाकर त्रिपाठी, विकास, ठाकूर श्रावण सिंह, महेश, अश्विनी, विष्णू, महेंद्र पाल आणि जानकी यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

Read more on HinduismPro Hindu

Latest News