Menu Close

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कराचीमधील हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

  • पाकमधील हिंदूंना कुणीही वाली नाही, हे लक्षात घ्या !
  • पाकमधील हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी, त्यांचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले पाहिजे !
बसंत कुमार आणि त्याची आई यांना ठार मारण्याची धमकी

कराची (पाकिस्तान) : पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी असतांनाही हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न थांबलेला नाही. येथे इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे १२ एप्रिल या दिवशी पीआयए टाऊनशिपमध्ये एका हिंदु कुटुंबावर आक्रमण करण्यात आले. कराची पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

इस्लाम स्वीकारण्यास विरोध केल्यास बसंत कुमार आणि त्याची आई यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. बसंतच्या भावाने व्हिडिओमध्ये ही घटना सांगितली आहे. त्याने आरोप केला की, ४-५ मुसलमान धर्मोपदेशकांनी त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकी दिली आणि त्यांच्यावर आक्रमण केले. मौलाना उस्मान याने आईला मारहाण केली आणि तिला कलमा (इस्लाममधील एक धार्मिक वाक्य) वाचण्यास सांगून इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. ३ दिवसांपूर्वी मौलाना उस्मान आणि बसंत यांच्यात वादावादी झाली होती.  तेव्हा उस्मान याने धमकी दिली की, तो लवकरच याचा सूड घेईल.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *