Menu Close

रामनाथ (अलिबाग) येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जेएन्यू विद्यापिठामधील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे प्रकरण

रामनाथ (अलिबाग) : जेएन्यू विद्यापिठामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना करून पुतळ्याखाली आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या समजविघातक प्रवृतींची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयीचे निवेदन रायगड उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांना १९ नोव्हेंबर या दिवशी दिले. हे निवेदन स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘अशा प्रवृतींना विरोध करायलाच पाहिजे.’’

या वेळी आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. रवी आंबेकर, ‘समरसता’ संघटनेचे कुलाबा जिल्हाप्रमुख अधिवक्ता श्रीराम ठोसर, बजरंग दलाचे संयोजक श्री. आकाश गोंधळी, तसेच अलिबाग तालुक्याचे धर्मप्रसार प्रमुख अधिवक्ता सतीश पाटील, रामकृष्ण परमहंस मठाचे वरद पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *