Menu Close

बांगलादेशामध्ये रोहिंग्या जिहाद्यांंकडून बौद्ध कुटुंबातील ४ सदस्यांची गळा चिरून हत्या

  • भारतात घुसलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या उद्या हिंदूंच्या अशा हत्या करू लागण्यापूर्वी त्यांना भारतातून हाकला !
  • इस्लामी बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक असुरक्षित !

ढाका : बांगलादेशाच्या कॉक्स बाजार जिल्ह्यातील उखिया उपजिल्ह्यामध्ये एका बौद्ध कुटुंबातील २ महिला आणि २ लहान मुले यांची रोहिंग्या जिहाद्यांंनी २५ सप्टेंबरला मध्यरात्री घरात घुसून गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी उखिया उपजिल्ह्यातील पुरबा रत्ना गावामध्ये जाऊन मृतदेह कह्यात घेतले, अशी माहिती उखियाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निहाद अदनान यांनी दिली. इस्लामी जिहादी गटांना स्थानिक सत्ता बळकवायची असल्याने ते कॉक्स बाजार आणि चितगाव क्षेत्रांमध्ये आदिवासी अन् बौद्ध लोकांमध्ये भय निर्माण करत आहेत. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामी बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदु, बौद्ध आणि ख्रिस्ती जिहादी आक्रमणाचे बळी ठरत आहेत. बांगलादेश सरकार या वंचित अल्पसंख्याकांची काळजी घेण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *