Menu Close

सांगली येथे वास्तूशांतीचे औचित्य साधून रामनाम संकीर्तन अभियान

मणेराजुरी येथे श्रीरामनाम जप करतांना भाविक

मणेराजुरी (तालुका तासगाव, जिल्हा सांगली) : वास्तुशांतीचे औचित्य साधून कार्यक्रमासाठी जमलेले नातेवाईक आणि पाहुणे यांना एकत्र करून रामराज्यासम ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी रामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. यात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. कांता वांडरे आणि सौ. कमल वांडरे यांनी उपस्थितांकडून श्रीरामाचा नामजप करवून घेतला. या वेळी अनुमाने ४० महिला उपस्थित होत्या.

विश्रामबाग येथे श्रीरामनाम जप करतांना धर्मप्रेमी

सांगली : विश्रामबाग येथील धर्मप्रेमी सौ. निशा साठे यांच्या घरी घेण्यात आलेल्या रामनाम संकीर्तन अभियानासाठी १५ धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या.

मिरज : येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीरामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. या वेळी ५५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *