Menu Close

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम : यवतमाळ येथे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

पोलीस उपअधीक्षक नरुल हसन (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

यवतमाळ : शासनाचा अध्यादेश डावलून आणि अनुमती नसतांना प्लास्टिकचे ध्वज विकणारे विक्रेते, तसेच सामान्य व्यक्ती, संस्था, समूह यांपैकी जे कोणी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ३० जुलैला पोलीस उपअधीक्षक नरुल हसन यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रध्वजाची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे आणि सनातन संस्थेचे श्री. पांडुरंग पिल्लेवार उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *