Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी नामजप आणि देवाला साकडे !

इंदिरानगर येथील मंदिरात साकडे घालतांना भाविक

नाशिक : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील विघ्ने दूर व्हावीत आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे यासाठी जिल्ह्यात विविध मंदिरांत नामजप करण्यात आला आणि भाविक अन् मंदिरातील पुजारी यांनी देवाला साकडे घातले.

शहरातील गंगापूर परिसरातील श्रीक्षेत्र दत्तधाम पीठ, गोवर्धन या सुप्रसिद्ध प्राचीन मंदिरात साकडे घालतांना ८० हून अधिक भाविक उपस्थित होते. यासह पंचवटी येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिर परिसरातील मारुति मंदिर आणि इंदिरानगर परिसरातील मारुति मंदिरातही साकडे घालण्यात आले.

इंदिरानगर येथील मंदिरात तसेच दहिपूल येथील पंचवटी परिसरातील कानडा मारुति मंदिरात नामसंकीर्तन करण्यात आले. ‘गंगापूर रस्ता’ येथील दक्षिणमुखी मारुति मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी मंदिरात दर्शनाला येणार्‍या भाविकांनीही सामूहिक नामजपामध्ये सहभाग घेतला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *