Menu Close

चोपडा (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चौकाचौकात सामूहिक गुढीचे आयोजन !

जळगाव : गुढीपाडव्यानिमित्त चोपडा शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात सामूहिक गुढीचे पूजन करण्यात आले. वीर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप ओली यांनी सपत्नीक गुढीचे पूजन केले. विवेक महाराज यांनी गुढीचे पौरोहित्य केले. तसेच शहरातील सानेगुरुजी नगर, भाट गल्ली, गांधीचौक, बारी वाडा, गोलमंदिर, अलकरी वाडा, नवग्रह मंदिर या ठिकाणी सामूहिक गुढ्या उभारण्यात आल्या. सर्वप्रथम हिंदु धर्मध्वज पूजन ह.भ.प मनोज बागुल यांनी केले.

या वेळी वाहनावरील प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवाजी चौकातून हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातून सकाळी ९.३० वाजता पदफेरी काढण्यात आली. यात नऊवारी साड्या घातलेल्या मराठमोळ्या तरुणी ढोल-ताशा वाजवत सहभागी झाल्या. पदफेरी मेन रोड-गोल मंदिर-नागलवाडी चौक-थाळनेर दरवाजा मार्गे जाऊन गांधी चौकातील श्रीराम मंदिरात त्याची सांगता झाली. पदफेरीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी हिंदु धर्मध्वजाचे माता-भगिनींनी पूजन केले. या वेळी हिंदू नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. फेरीला असंख्य हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *