Menu Close

पाकिस्तानी दिनानिमित्त फुटिरतावाद्यांना आमंत्रण

एकीकडे क्रिकेट द्वारे भारत हा पाकिस्तानशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान काश्मीर मधील फुटिरतावाद्यांना “पाकिस्तान दिन” साजरा करण्याचे निमंत्रण देऊन भारताला डिवचत आहे – संपादक, हिंदुजागृती

नवी दिल्ली : पाकिस्तानी दिनानिमित्त काश्‍मीरमधील फुटिरतावादी नेते सईद अली गिलानी व असिया अंद्राबीसह अन्य नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

‘पाकिस्तानचे राजदूत अब्दुल बसीत यांनी पाकिस्तानी दिनानिमित्त (२३ मार्च) काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेते गिलानी, अंद्राबी यांच्यासह यासीन मलिक, मरवैझ उरम फारुख व पंतप्रधान कार्यालयातील जितेंद्र सिंग यांना आमंत्रित केले आहे,‘ अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तान दरवर्षी पाकिस्तानी दिनानिमित्त काश्‍मीरमधील फुटिरतावाद्यांसह राजधानीमधील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना आमंत्रित करत आहे.

संदर्भ : सकाळ

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *