Menu Close

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा : हिंदु धर्माभिमान्यांची तहसीलदारांकडे मागणी

ttue03
तहसीलदार मनीषा खत्री (मध्यभागी बसलेल्या) यांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी

कागल : श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना देण्यात आले. (सर्वत्रचा वाढता विरोध पहाता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, उपतालुकाप्रमुख श्री. शिवगोंड पाटील, शिवसेनेचे श्री. भाऊसो पाटील, भाजप सरचिटणीस श्री. आनंद मांगले, शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री विजय आरेकर, अर्जुन केसरकर, संतोष जाधव, चेतन चव्हाण, राजेंद्र भोजे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष सणगर, प्रीतम पवार, गोविंद पाटील, दीपक भोपळे, तसेच अन्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *