Menu Close

यवतमाळ : ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार (डावीकडे)

यवतमाळ : येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस-प्रशासनास निवेदन देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार यांना निवेदन दिल्यावर त्यांनी ‘जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना, तसेच महाविद्यालयीन परिसरात गस्त वाढवण्यासाठी सूचना देऊ’, असा सकारात्मक प्रतिसाद दिला.

निवेदन स्वीकारतांना तहसीलदार चंद्रशेखर कुंभलकर (उजवीकडे)

जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार चंद्रशेखर कुंभलकर यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना योग वेदांत सेवा समितीचे श्री. विनोद कातरकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रशांत सोळंके, दत्ता फोकमारे, महिला उत्थान मंडळाच्या सौ. नीताताई मुंदाफळे, सौ. विभा पिसाळकर, सौ. दीपा वैद्य, सौ. मंदाताई उके आदी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *