Menu Close

म्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

  •  क्यातमारनहळ्ळी येथे हिंदूंच्या हत्यांचे सत्र चालूच !
  •  आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश !

दादरी, रोहित वेमुला आदी प्रकरणी असहिष्णुतेच्या नावावरून ऊर बडवून घेणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या होत असलेल्या हत्यांविषयी तोंड का उघडत नाहीत ? कि हिंदुत्ववाद्यांच्या हत्या या त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाहीत ? – संपादक, हिंदु जागृती

म्हैसूर : कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. बी राजू असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव असून रविवारी चहाच्या टपरीवर उभे असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

शहरात प्रतिबंधात्मक सुचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती सद्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी याप्रकरणी भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणा देत आंदोलन केलं.पोलिसांनी जलदगतीने तपास करत हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संदर्भ : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *