Menu Close

सूरत (गुजरात) येथील ‘केबल’चे मालक जयेश मालाविया यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्री. जयेश मालाविया (डावीकडे) यांना ग्रंथ आणि प्रसारसाहित्य भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी) : सूरत येथील केबल नेटवर्कचे मालक श्री. जयेश मालाविया यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री. मालाविया यांना हिंदु जनजागृती समितीचा ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला.

या प्रसंगी श्री. मालाविया यांनी त्यांच्या ‘केबल’वरून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत ‘धर्मशिक्षणवर्गाचे महत्त्व, तसेच हिंदु धर्मातील सण, उत्सव यांची शास्त्रीय माहिती’ विशद करणारे व्हिडिओ प्रसारित करू, असे आश्‍वासन दिले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *