Menu Close

सनातनच्या कार्यक्रमांसाठी मंदिर उपलब्ध करून देणार्‍या विश्‍वस्तांना पोलिसांकडून दमदाटी !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या कार्यात अडथळे आणणे, हा पोलिसांचा हिंदुद्वेषच होय ! असे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ?

‘एका शहरात सनातनच्या कार्यक्रमासाठी राममंदिर विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते; मात्र नुकतेच सनातनच्या साधकांनी कार्यक्रमासाठी राममंदिर उपलब्ध करून देण्याची मागणी केल्यानंतर मंदिराच्या विश्‍वस्तांनी सांगितले, ‘‘माझ्याकडे एका राज्यातील पोलिसांचे पथक आले होते. त्यांच्यासमवेत स्थानिक पोलीसही होते. या पोलिसांनी माझी चौकशी करतांना सनातनच्या कार्याचीही चौकशी केली आणि सांगितले, ‘‘तुम्ही सनातनच्या कार्याला जागा देऊ नका. जागा दिलीत, तर अडचणीत याल.’’ त्यामुळे या वेळी तुम्हाला राममंदिराची जागा मी नाकारली. सनातनचे कार्य जेथे जेथे चालू आहे, तेथे तेथे हे पोलीस पथक गेले होते, असेही पोलिसांशी चर्चा करतांना समजले.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *