Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक !

जळगाव : यावल येथील श्री. कोहळेश्‍वर श्रीराम मंदिरात हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव कसा साजरा करायचा ?, तसेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या अनुषंगाने साधना करून स्वत:चे आध्यात्मिक सामर्थ्य कसे वाढवायचे ? या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी ६० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *