Menu Close

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाळला तृप्ती देसाईंचा प्रतिकात्मक पुतळा !

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भारतीय पोशाखाचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईने जर नवरात्रोत्सवात येऊन आंदोलन करण्याचा कोणताही अनुचित प्रकार केला, तर त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ३ ऑक्टोबर या दिवशी महाद्वार पुतळा येथे तृप्ती देसाईंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. त्या वेळी ही चेतावणी देण्यात आली. या वेळी हिंदु एकताचे श्री. चंद्रकांत बराले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे श्री. किशोर माळी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री शरद माळी, सुनील पाटील, मनोहर सोरप यांसह अन्य कायकर्ते, महिला उपस्थित होत्या.

हिंदू युवा प्रतिष्ठानने तृप्ती देसाईचा निषेध केला असून ‘मंदिरात सोवळे नेसून नाही, तर काय ‘ब्लेझर’ घालून पूजा करायची का ?’,  असा प्रश्‍न हिंदू युवा प्रतिष्ठानने प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *