Menu Close

देवरिया (उत्तरप्रदेश) येथील ४ सरकारी शाळांना ‘रविवार’ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टी !

शिक्षण विभागाच्या चौकशीत माहिती उघड

भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून शाळांचे इस्लामीकरण होणे, हे लज्जास्पद होय. इतर वेळी शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा टाहो फोडणारे पुरोगामी या घटनेनंतर गप्प का ?

देवरिया : देवरिया जिल्ह्याच्या सलेमपूर क्षेत्रातील नवलपूर येथे एका सरकारी शाळेचे नाव ‘इस्लामिया प्राथमिक शाळा’ केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. तसेच त्या शाळेला ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टीही घोषित केली आहे. या प्रकरणाची चौकशी प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी संतोष देव पांडेय करत असतांना त्यांना त्याच जिल्ह्यातील अन्य ४ सरकारी शाळांना ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टी घोषित करण्यात आली आहे. हा प्रकार गेली काही वर्षे चालू असून त्यावर स्थानिकांनी कोणतीही तक्रार केलेली नाही.

या प्रकरणी पांडेय यांनी सांगितले की, त्या शाळांच्या प्राचार्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून कारवाईची चेतावणी देण्यात आली आहे.(अशा शाळा आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर राज्यातील भाजप सरकारने कारवाई करायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याचसमवेत ‘इस्लामिया प्राथमिक शाळे’च्या नावावर रंग लावून शाळेचे पुन्हा मूळ नाव लिहिण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *