Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी घेतली शिवभक्त पू. थंबीरन्थोझर कपिलानर यांची भेट

पू. थंबीरन्थोझर कपिलानर उपाख्य शिवपुरम् आय्या यांची भेट घेतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी शिवभक्त पू. थंबीरन्थोझर कपिलानर उपाख्य शिवपुरम् आय्या यांची नुकतीच चेन्नई येथे भेट घेतली. या भेटीच्या वेळी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी त्यांना गोवा येथे होणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण दिले असता पू. स्वामीजी म्हणाले, भगवान शिवाने अनुमती दिल्यास हिंदू अधिवेशनाला उपस्थित रहाणे शक्य होईल.’’ याप्रसंगी पू. स्वामीजींनी त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभूती कथन केल्या. तमिळनाडूचे शिवभूमीत रूपांतर करण्यासाठी शिवनिजम्’चा प्रसार करण्याचा आदेश (सूक्ष्मातून) भगवान शिवाने दिला आहे’, असे स्वामीजींनी श्रद्धापूर्वक सांगितले. सूक्ष्म स्तरावर चालू असलेल्या युद्धाविषयीची माहितीही त्यांनी या वेळी दिली. ही भेट पू. स्वामीजींचे भक्त तथा हिंदुत्वनिष्ठ डॉ. कार्तिकेयन् यांनी घडवून आणली.

पू. शिवपुरम् आय्या यांचे वास्तव्य श्रीलंकेत असते; मात्र ते काही दिवसांसाठी ते भारतात आले आहेत. तमिळनाडूतील थिरुवन्नमलाई येथे पू. स्वामीजींचा आश्रम आणि गुरुकुल आहे. पू. स्वामीजींची शिकवण तमिळींच्या थिरुवसागम्’ या पवित्र ग्रंथावर आधारलेली आहे. आपले दैनदिन जीवन ईश्‍वरभक्तीत कसे घालवायचे, याविषयी ते भक्तांना मार्गदर्शन करतात.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *