Menu Close

अल्पवयीन मुलीवर धर्मांध आणि मित्राकडून सामूहिक बलात्कार, तिघेही कह्यात !

बदलापूर (जिल्हा ठाणे) : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका धर्मांधांसह त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे. या प्रकरणी धर्मांध अहमद खान (१८), रविंद्र सांजेकर (२४) (रा. शिरगाव) आणि एक अल्पवयीन आरोपी यांना अटक केली आहे.

बदलापूर पूर्व येथील गणेशनगर, आपटेवाडी भागात रहाणार्‍या या अल्पवयीन मुलीच्या ओळखीचे असणारे हे तीन नराधम तिला पनवेल महामार्गावरील येथील डोंगरावर घेऊन गेले. या ठिकाणी या तिन्ही नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या जबानीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा प्रविष्ट केला असून धर्मांध अहमद खान, रविंद्र सांजेकर यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *