Menu Close

चिकोडी येथील पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेची अनुमती नाकारली ! 

कर्नाटकातील काँग्रेसचे हिंदुद्वेष्टे सरकार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेचे २८ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी सभेला अनुमती नाकारली आहे. पू. भिडेगुरुजी  यांना ७ मार्चअखेर बेळगाव प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या आजपर्यंत महाराष्ट्रसह कर्नाटकात अनेक वेळा सभा झाल्या आहेत. त्या वेळी कधीही त्यांच्या सभांमुळे कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण झाला नाही, तर मग अचानक आताच असे काय झाले की सभेची अनुमती नाकारावी ? अनुमती नाकारणे ही काँग्रेस सरकारची दडपशाहीच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही सभा न होण्यासाठी काही संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिल्याचे समजते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *