Menu Close

कराड (जिल्हा सातारा) येथे कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या गोवंशाची हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून सुटका

असे धर्मप्रेमी सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

चचेगाव (तालुका कराड, जिल्हा सातारा) : येथे २२ फेब्रुवारीच्या रात्री कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या १४ गोवंशाची हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी कसायाच्या तावडीतून सुटका केली. गोरक्षकांनी गाडी अडवल्यानंतर वाहनचालक आणि त्याची महिला साथीदार वाहन सोडून पळून गेले. या वाहनावर हिंदु देवतांची नावे लिहिली असून वाहन क्रमांकही जाणीवपूर्वक चुकीचा लावल्याचे उघड झाले. (स्वत: हिंदु असल्याचे भासवून गोहत्या करणारे धूर्त समाजकंटक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या वाहनात २ ते ३ मासांची ६ खोंडे आणि ८ वासरे होती. हंबरण्याचा आवाज बाहेर येऊ नये, यासाठी त्यांच्या तोंडावर चिकटपट्टीने लावण्यात आली होती. (गोवंशाचा क्रूरपणे छळ करणार्‍या समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी गोप्रेमींची अपेक्षा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी हिंदू एकता आंदोलनाचे सर्वश्री जिल्हा कार्यवाहक राहुल यादव, रूपेश मुळे, तात्या कदम, शहाजी पवार, महेश माने, दिग्विजय मोरे, प्रमोद देसले, अभिजीत कारंडे आदी गोप्रेमी उपस्थित होते. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास चालू आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *