Menu Close

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे कार्य भारतात प्रथम क्रमांकाचे ! – शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठाणवाला, अध्यक्ष, एन्.के.टी. विद्यालय

डावीकडून शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठाणवाला यांना ग्रंथ भेट देतांना सौ. स्मिता नवलकर आणि अन्य

ठाणे : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे कार्य करत आहेत. सनातन संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे धर्मप्रसार आणि संस्कार यांचे कार्य, तसेच भारतात रामराज्य येणाच्या दृष्टीने करण्यात येणारे कार्य पुढे अधिक वाढण्यासाठी शुभेच्छा !, असे प्रतिपादन येथील एन्.के.टी. विद्यालयाचे अध्यक्ष शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठाणवाला यांनी केले.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सनातनची ग्रंथसंपदा घेऊन मुलांना घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकांसाठी कार्यशाळा ठेवणार असल्याचेही त्यांना आश्‍वासन दिले. त्यांच्या सचिवांना त्यांनी सनातनच्या साधकांची महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट करून देण्याविषयी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मुकुंद घाणेकर, श्री. बळवंत पाठक आणि सनातनच्या सौ. स्मिता नवलकर उपस्थित होते. ठाणवाला यांना ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ आणि कुंभमेळ्याविषयीचे ग्रंथ देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *