Menu Close

बेंगळुरु येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा

बेंगळुरु : बेंगळुरूच्या ‘कुमारस्वामी लेआऊट’मधील वरसिद्धी विनायक मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, युवा ब्रिगेडचे श्री. श्रीकांत आणि सनातन संस्थेच्या सौ. तारा हर्षवर्धन शेट्टी, हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती विशद केली; तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूसंघटन आणि धर्माचरण यांचे महत्त्व सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *