Menu Close

त्र्यंबकेश्‍वर येथील डॉ. बिंदू महाराज यांचा षष्ठीपूर्ती सोहळ्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान

डॉ. बिंदू महाराज यांचा सन्मान करतांना समितीचे श्री. शशिधर जोशी

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील श्री बिंदूधाम आश्रमात तंत्रशक्तीपीठाधीश्‍वर, योगीराज, कोळकुळाचार्य, डॉ. बिंदू महाराज यांच्या षष्ठीपूर्तीचा भव्य सोहळा येथे ७ फेब्रुवारीला पार पडला. यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी डॉ. बिंदू महाराज यांचा पुष्पहार देऊन सन्मान केला. डॉ. बिंदू महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या भावी कार्यास आशीर्वाद दिले. या वेळी आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. सागरानंदसरस्वती महाराज, आचार्य श्रीकांत महाराज, अनेक साधू-संत आणि भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

भगवान उदासीनाचार्य जगद्गुरु श्री श्रीचन्द्रदेवजी यांच्या पूजा अभिषेकाने सोहळ्याला आरंभ झाला. डॉ. बिंदू महाराज यांच्या शिष्या कु. गायत्री यांना या वेळी संन्यास दीक्षा देण्यात आली, तसेच हवन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *