Menu Close

जिग्नेश मेवाणी, प्रकाश आंबेडकर, उमर खालिद यांच्या नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांची चौकशी करा !

स्वराज्य निर्माण सेनेची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

जळगाव : जिग्नेश मेवाणी, प्रकाश आंबेडकर, उमर खालिद, तैलतुंबडे आणि त्यांचा भाऊ यांचे देशविघातक नक्षलवाद्यांशी संबंध आहेत का, याची सखोल चौकशी करावी. तसेच महाराष्ट्रात पुकारलेल्या बंदच्या काळात झालेली हानी आंबेडकर यांच्या संघटनेकडून वसूल करावी, अशी मागणी स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारात पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा काहीही संबंध नसतांना विनाकारण त्यांचे नाव गोवले जात आहे. खरे तर एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा प्रकार घडला, असेही स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. महेश सपकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Hindu Organisations

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *