Menu Close

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

भाजपच्या राज्यात अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

गोंडा (उत्तरप्रदेश) : येथील बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबाचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले. या कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी (वय ४० वर्षे) या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले होते. नंतर तिच्या एका मुलाचा विवाह एका मुसलमान मुलीशी झाला. या महिलेच्या सावत्र मुलाने या संदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे. उस्मान नावाच्या व्यक्तीने त्यांचे धर्मांतर केल्याचे या मुलाने म्हटले आहे. तसेच त्यांची सर्व संपत्ती त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली. पोलिसांनी उस्मान याला अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *