Menu Close

ईश्‍वरपूर येथील श्रीपंथ इंडस्ट्रिजमध्ये तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन !

ईश्‍वरपूर : येथील श्रीपंथ इंडस्ट्रिजमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी केले. मार्गदर्शन ऐकून झाल्यावर अनेकांनी नामजप, तसेच मार्गदर्शनात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याचा लाभ आस्थापनाचे कामगार आणि अधिकारी अशा ३० जणांनी घेतला.

श्रीपंथ इंडस्ट्रिजचे मालक श्री. आनंद शेलार यांच्या कारखान्यात त्यांनी दत्त मंदिराची स्थापना केली असून तेथे प्रतिवर्षी श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने पारायण, भजन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याचा लाभ भाविक मोठ्या संख्येने घेतात. श्री. आनंद शेलार हे सद्गुरु पंत बाळेकुंद्री महाराज यांचे अनुयायी असून मार्गदर्शन झाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. भरत जैन आणि अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांचा सद्गुरु पंत बाळेकुंद्री महाराज यांचे छायाचित्र देऊन सत्कार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *